*राज्यातील मुलींची १०० टक्के फी माफ
*महिला दिनी मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा
बल्लारपुर/
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत मोठी घोषणा केली.
महाराष्ट्र राज्यातील मुलींना शिक्षण शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय जाहीर केला
व सर्व पक्षीय आमदारांनी या घोषणेचे केले स्वागत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
म्हणतात
_महिलांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांना सक्षम करण्याच्या दिशेने हा मोठा टप्पा आहे. शिक्षणामुळे महिलांना अधिक संधी उपलब्ध होतील, त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासालाही गती मिळेल.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या घोषणेमुळे राज्यातील विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.आता या घोषणे मुळे राज्यातील
`मध्यमवर्गीय कुटुंबातील अनेक मुली आर्थिक परिस्थितीमुळे पुढे शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. खास करून, ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे त्यांच्यासाठी शिक्षणाची दारे अधिक खुली झाली आहेत. आता मुलींच्या शिक्षणावरील आर्थिक बोजा कमी झाल्यामुळे पालकांनाही या निर्णयाचे स्वागत केले आहे
0 टिप्पण्या