प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यां द्वारे राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भय्या अहिर यांचा भव्य सत्कार

*प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांतर्फे राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैय्या अहीर यांचा भव्य सत्कार संपन्न.

राजूरा

राजुरा येथील शेतकऱ्यांच्या वतीने कोलगाव कोळसा खाणीत उर्वरीत सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करून सर्व लाभ मिळवून देण्याचा निर्णय माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री व ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचा कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या वतीने भव्य जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ माजी आमदार संजय धोटे यांच्या अध्यक्षतेत व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी  शेतकऱ्यांना सर्वतोपरी सदैव न्याय मिळवून देण्याची माझी नेहमी भूमिका राहीली आहे व समोर सुद्धा राहील अशी ग्वाही व  आपल्या  भावना हंसराज अहीर यांनी व्यक्त केल्या या प्रसंगी माजी आमदार संजय धोटे व माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या सह  इतर मान्यवरांनि विचार व्यक्त केले. सत्कार समारंभाला प्रमुख पाहुणे अरुण भाऊ मस्की, वाघुजी गेडाम, राजू घरोटे, सुनील उरकुडे, गणेश झाडे,    प्रशांत घरोटे, कृषी सरपंच उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, सरपंच सौ.अनिता पिंपळकर, उपसरपंच पुरुषोत्तम लांडे, चुनाळा ग्रामपंचायत चे सरपंच बाळनाथ वडस्कर, दिलीप वांढरे सचिन शेंडे, प्रदीप बोबडे सह मान्यवर तथा हजारोंच्या संख्येने शेतकरी, महिला उपस्थित होत्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या