बल्लारपुर भाजप महिला आघाडी च्या जागतिक महिला दिवस सम्पन्न
बल्लारपुर/
बल्लारपुर भाजपच्या महिला आघाडी तर्फ बल्लारपुर येथे महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमास श्री.चंदनसिंह चंदेल (माजी,अध्यक्ष वनविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य) व वरिष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती होती. कार्यक्रमाचा शुभारंभ चंदनसिंह चंदेल यांच्या शुभ हस्ते भारत माता व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि दिप प्रज्वलित करुन झाला.या प्रसंगी चंदनसिंह चंदेल यांनी मार्गदर्शन करतांना सर्वप्रथम नारी शक्तिला नमन करून कोणताही देश,समाज किंवा घर व त्या घरची पिढी घडवायला महत्वपूर्ण भुमिका हि महीलांची असते. महीलांची बुद्धी, साहस, सहनशीलता हे अदम्य आहे.महिलांना शब्दात मांडता येत नाही विशेष करून भारतीय महिलांचा सुंस्कृत व आदर्शपणा हे याची जगात तोड नाही एवढा त्यांचा प्रताप आहे.या जागतिक महिला दिवसाचा अंतःकरणातुन शुभेच्छा देऊन समस्त महिला मंडळी च्या उज्वल भविष्याची कामना चंदनसिंह चंदेल यांनी केली.प्रसंगी मंचावर प्रदेश कार्यकारणी सदस्य रेणुकाताई दुधे ,महिला आघाडी अध्यक्ष वैशाली जोशी ,महामंत्री वर्षा सुंचुवार ,आरती अक्केवार कांता ढोके , सारिका कनकम जयश्री मोहुर्ले ,सुवर्णा भटारकर होते कार्यक्रमाचे संचालन सुरेखा श्रीवास्तव ने केले या प्रसंगी अन्य मान्यवर आणि कार्यकर्ता उपस्थित होते.या वेळी भाजपा महिला आघाडी ने विविध कार्यक्रम व खेळ महिला कार्यकरत्या साठी आयोजित करण्यात आला व जिंकलेल्या विजेत्यांना पुरस्कृत दिला ।
0 टिप्पण्या