भारतीय जनता पार्टी कोरपना तर्फे पक्ष संघटना मजबूत करण्या बाबत बैठकीचे आयोजन




   भारतीय जनता पार्टी कोरपना तालुका तर्फे पक्ष संघटना मजबूत करण्या बाबत बैठकीचे आयोजन 

पक्ष संघटन मजबूत करा,असे आव्हान  हंसराज अहिर (राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री, भारत सरकार) यांनी केले
विश्राम गृह कोरपना येथे भारतीय जनता पार्टी, कोरपना तालुक्याच्या वतीने पक्ष संघटन बैठकीचे आयोजन करण्यात आले.
या बैठकीचे अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री  हंसराज अहिर होते तर प्रमुख पाहुणे माजीआमदार संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निमकर ,अरुण मस्की जिल्हा उपाध्यक्ष, राजु बघरोटे जिल्हा किसान आघाडी अध्यक्ष, नारायण हिवरकर भाजप माझी तालुका अध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष, शिवाजीराव शेलोकर, संजय मुसळे तालुका अध्यक्ष, निलेश शंकरराव ताजने, किशोर बावणे, रमेश पाटील मालेकर,कवडू जरिले, अबरार अली, शशिकांत आडकिने, वसंता बहिरे, तिरूपति कन्नाके,अल्काताई रणदिवे, जयाताई धारणकर, डोहेताई, वर्षांताई लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते हंसराज अहिर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कोरपना तालुका हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला असुन इथुन खासदारखी चार वेळा जिंकली,आमदारकी तिन वेळा जिंकलो,स्वराज्य संस्थेच्या निवळनुका अनेक वेळा जिंकल्या हा तालुका भाजपचा गड आहे मी आव्हान करतो की भारतीय जनता पार्टीत अनेक वर्षा पासुन निष्ठावंत पदाधिकारी कार्यकर्ते काम करीत आहे त्यांना सुध्दा धन्यवाद देतो प्रत्येक पदाधिकारी,कार्यकर्त्यानी पक्ष संघटनेच काम एक निष्ठ होवुन करावे असे आव्हान केले तसेच माजी आमदार संजय धोटे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्या बाबत आव्हान केले तसेच माजी आमदार  सुदर्शन निमकर  यानी आपले मनोगतात व्यक्त केले बैठकीला भाजप पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
बैठकीच संचालन मा तालुका अध्यक्ष  नारायण हिवरकर यांनी केले तर आभार निलेश ताजने यांनी मानले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या